सोनगेवाडी ओमनगर येथे सुजित जाधव यांच्या माध्यमातून बसवण्यात आला रोड मिरर

सुजित जाधव यांनी दिली नवीन वर्षाची भेट !
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 02, 2023 18:05 PM
views 223  views

कणकवली : सोनगेवाडी-ओमनगर फाट्याजवळ नेहमी समोर येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात होतात. त्यामुळे तेथील नागरिकांनी रोड मिरर बसवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांच्याकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने सुजित जाधव यांनी नवीन वर्षाची भेट म्हणून स्वखर्चातून हा रोड मिरर ओम नगर फाट्याजवळ बसविण्यात आला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी सुजित जाधव यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. सत्तेत नसताना देखील सुजित जाधव हे जणसामान्यांच्या गरजा पूर्ण करतात हे आजच्या या कामातून त्यांच्या दिसून येत आहे