कणकवली नगरपंचायतचे पेट्रोल पंपा समोर फिरते शौचालय !

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 24, 2023 19:33 PM
views 309  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत प्रशासनाने कणकवली शहरामध्ये पेट्रोल पंपा समोर फिरते शौचालय म्हणजेच मोबाईल टॉयलेट उभे केले आहे.

कणकवली शहरामध्ये बहुसंख्य बाहेरून येणारे प्रवासी तसेच भाजीविक्रेते शौचालयासाठी बस स्थानकात जावे लागत होते व भाजी मार्केटमध्ये उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे काम सुरू असल्याने ते देखील बंद होते. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने पेट्रोल पंपा समोर फिरते शौचालय भाजीविक्रेते तसेच कणकवलीतील  नागरिकांना उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे भाजी विक्रेते व कणकवलीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे