
वैभववाडी : जमिनीच्या वादाच्या रागातून तिरवडे तर्फे खारेपाटण येथे भावकीत वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. येथील विजय केशव पावले (वय-४१) याला तिघांनी मारहाण केली. या प्रकरणी तिघांविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तिरवडे तर्फे खारेपाटण येथील पावलेवाडी येथील विजय पावले आणि विलास पावले यांच्यात जमीनीवरून वाद आहेत. दरम्यान १४ डिसेंबर रोजी विलास, त्यांची पत्नी विजया पावले आणि मुलगी विशाखा पावले या तिघांनी विजय यास काठीने मारहाण केली. यामध्ये त्याला दुखापत झाली होती. याशिवाय शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात त्याने काल ता.२७ रात्री उशिरा तिघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.