कष्टकऱ्यांच्या गुणवंत मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप..!

Edited by: भगवान शेलटे
Published on: July 06, 2024 06:44 AM
views 132  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हॉकर्स फेडरेशनच्या सावंतवाडी तालुका शाखेच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील सर्व फेरीवाल्यांचा वार्षिक स्नेह मेळावा दिनांक ०५ जुलैला सावंतवाडी इथं झाला. याचं उद्घाटन सावंतवाडी नगर परिषदचे प्रशासकीय अधिकारी वैभव अंधारे यांच्याहस्ते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष  अॅड. संदीप निंबाळकर आणि प्रमुख उपस्थिती जिल्हा सेक्रेटरी महेश परुळेकर, तालुका अध्यक्ष अजय जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला.

फेरीवाले हे जवळपास १४ तास काम करतात. यांच्या मुलांनी दहावी बारावी मध्ये विशेष यश संपादन करून यशस्वी झालेत त्यांच्या यावेळी सत्कार करण्यात आला. जवळपास 20 मुलांचा सत्कार भेटवस्तू , शाल आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. तसेच अनेक वर्षे ज्याने फेरीवाले म्हणून काम केलं आणि आपला उदरनिर्वाह चालवत फेडरेशनसाठी आयुष्यभर काम केलं त्या ज्येष्ठ फेरीवाल्यांच्या सत्कार  शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.

तसेच सावंतवाडी नगर परिषदेचे सफाई कर्मचारी जे नियमितपणे बाजार संपल्यानंतर रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत काम करतात त्या जवळपास 12 सफाई कामगारांचा सत्कार  भेटवस्तू शाल पुस्पगुच्छ देऊन करण्यात आला. अशा पद्धतीने कष्टकऱ्यांच्या मुलांचा कष्टकऱ्यांचा सत्कार करणे फार आवश्यक आहे. आपणही शेतकऱ्यांचा मुलगा असून आपल्या वाट्याला जे काम आलं ते काम करत असताना शिक्षणाकडे अधिक लक्ष दिला पाहिजे असे विचार अंधारे यांनी मांडले.

तर कष्टकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक करणे हे नगर परिषदेचे काम आहे आणि त्यामुळे नवीन बाजाराच्या जागेच्या समस्या आहेत फेरीवाले वाढत आहेत त्यामुळे जागा वाढवून मिळावी   , सकाळी लवकर येणाऱ्या या फेरीवाल्यांना फिरते शौचालय उपलब्ध करून घ्यावे, गटार बंदिस्त करणे, लाईटची व्यवस्था करणे या गोष्टी तात्काळ पूर्ण करण्यात यावा अशी मागणी यावेळी जिल्हाध्यक्ष निंबाळकर यांनी केली. याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी भूमिका अंधारे यांनी मांडली.


यावेळी तालुकाध्यक्ष अजय दादा जाधव, सेक्रेटरी यशवंत कृष्णा बेळगावकर, खजिनदार हनिफ इस्माईल खान, उपाध्यक्ष मोहन सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष चंद्रिका राठोड, उपाध्यक्ष धनवंती चेंडके, उपखजिनदार सुभाष गेनू चव्हाण , बाबासाहेब दर्गा वाले, सह सेक्रेटरी अशरत अली शेख आणि जवळपास दोनशे फेरीवाले आपल्या कुटुंबासह उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सर्व फेरीवाल्यांसह वेंगुर्ला, बांदा, शिरोडा, दोडामार्ग, गडहिंग्लज, चंदगड आणि संकेश्वर या परिसरातील फेरीवाले फेडरेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश परुळेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यशवंत बेळगावकर यांनी केले तर आभार उपाध्यक्ष चंद्रिका राठोड यांनी मानले.