
सिंधुदुर्ग : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या स्टार प्रचारकांची 40 जणांची यादी जाहीर केली आहे. या महत्त्वपूर्ण यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन प्रमुख आमदारांना स्थान मिळाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात उत्साह संचारला आहे.
यादीत समावेश झालेल्या दोन आमदारांमध्ये आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांवर आता राज्यभरात पक्षाचा प्रचार करण्याची आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.










