चालत्या रिक्षाला गव्या रेड्याची जोरदार धडक

रिक्षाची काय अवस्था झाली बघा ?
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 27, 2023 20:29 PM
views 191  views

वैभववाडी :  चालत्या रिक्षाला गवा रेड्याने धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात झाला आहे. हा प्रकार वैभववाडी फोंडा मार्गावर खांबाळे दंड येथे शुक्रवारी (ता.२६ ) रात्री ८च्या सुमारास झाला.या अपघातात रिक्षातील प्रवासी सुदैवाने बचावले आहेत. मात्र रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

खांबाळे येथील रिक्षा चालक अनंत सखाराम हिंदळेकर हे शुक्रवारी रात्री तीन आसनी रिक्षामधून आचिर्णे येथून प्रवासी घेऊन वैभववाडी रेल्वे स्थानकाकडे जात होते.यादरम्यान खांबाळे दंड येथे रिक्षा आली असता त्यांच्या समोर अचानक गवारेडा आला. गवारेड्याने रिक्षा जवळ येताच रिक्षाला जोराची धडक दिली. या धडकेत रिक्षा पलटी झाली. रिक्षात चालकाव्यतिरिक्त तीन प्रवाशी होते. मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. धडकेनंतर गवारेडा पळून गेला.

      या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत रिक्षा चालक यांनी वैभववाडी पोलिस ठाणेत खबर दिली आहे.सह्याद्री पट्ट्यातील गावांमाध्ये गवारेंड्यांचा मूक्त संचार सुरु आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.खांबाळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा वावार वाढला आहे. वनविभागाने यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.