
सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या “सेवा पंधरवडा” उपक्रमाअंतर्गत भाजप युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडीत ''डिजिटल फिरता दवाखाना'' सुरू करून ग्रामीण आरोग्यसेवेत मोठ योगदान दिलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरु केलेला डिजिटल दवाखाना ही फक्त सुरुवात आहे. आमचे अंतिम ध्येय अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे हेच आहे असं मत श्री. परब यांनी व्यक्त केले. उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे ऑनलाईन मार्गदर्शन आणि आधुनिक वैद्यकीय तपासण्या घरादारापर्यंत पोहोचवून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. डिजिटल दवाखाना ही फक्त सुरुवात आहे. अंतिम ध्येय सावंतवाडीत अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे हेच आहे, असे मत श्री. परब यांनी व्यक्त केले. दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळण्यात आज अनेक अडचणी येत आहेत. त्यावर एकसंघपणे मार्ग काढणे ही काळाची गरज असून, येत्या काळात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जाणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरोग्य संकल्पना राबवली जात असून सर्वांच्या सहकार्याने जनतेसाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर उभारण्यात येईल असा विश्वास श्री परब यांनी व्यक्त केला.
आज सुरू झालेल्या या फिरत्या डिजिटल दवाखान्यामुळे सावंतवाडी मतदारसंघात आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदलाची सुरुवात झाली असून स्थानिक नागरिकांकडून याचे स्वागत केले जात आहे. श्री. परब यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी भाजपा नेते विशाल परब, ॲड.अनिल निरवडेकर, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, उपाध्यक्ष गुरुदत्त कल्याणकर, शक्ती केंद्र प्रमुख जयेश सावंत, सरपंच श्री. डिंगणेकर, उपसरपंच शैलजा नाडकर्णी, रंगनाथ गवस, अमेय पै, नितीन राऊळ, केतन आजगावकर आदी मान्यवर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.