
वैभववाडी : वैभववाडी तालुका शिक्षण संस्था व सामाजिक वनीकरण परिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय येथे हा उपक्रम राबविण्यात आला.जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रोहन रावराणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना त्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना अधिकाधिक झाडे लावण्याचे आणि त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. “वृक्ष लावा, वृक्ष जगवा” हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक अंकित काशीद, मुख्याध्यापक नादकर बी. एस., शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.











