आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमीटीची बैठक

Edited by:
Published on: April 12, 2024 13:59 PM
views 59  views

सिंधुदुर्गनगरी : सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व  कृषिकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या उपस्थित व मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे आगामी सण, उत्सव आणि आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमीटीची बैठक घेण्यात आली. बैठकी दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 बाबत लागू आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही. यासाठी ग्रामस्तरावर घ्यावयाची काळजी, संभाव्य घटना, संशयित व्यक्ती, याबाबत माहितीची वेळेत अदान-प्रदान होईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या शंकांचे  निरसन देखील केले.तसेच आगामी सण उत्सवाचा अनुषंगाने रमजान ईद, आंबेडकर जयंती, रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती निमित्त पारंपरिक पद्धतीने साजरे करणे विषयी सूचना दिल्या. उत्सवा दरम्यान आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेणेबाबत आपले स्तरावर ग्रामस्थांना माहिती द्यावी. अशी सूचना केली.

सदर बैठकीस शांतता कमिटी सदस्य, पोलीस पाटील व महीला दक्षता समिती सदस्य तसेच  सचिन हुंदलेकर, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, सिंधुदुर्ग व पोउपनि श्री दळवी उपस्थित होते.