'थ्रीप्स' संदर्भात औषध कंपन्या, डीलर, आंबा बागायतदारांची होणार संयुक्त बैठक

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 14, 2024 14:03 PM
views 297  views

देवगड : आंबा बागायतदारांसमोर 'थ्रीप्स' या फुलकीड रोगाचे मोठे संकट असून, यातून मार्ग कसा काढायचा यासाठीच आम्ही 'थ्रीप्स'वर अधिक संशोधन करण्यासाठी कीटकशास्त्रज्ञ श्री. मुंज चे यांची नियुक्ती केली आहे. आंबा बागायतदारांचा याबाबत कृषी अधिकाऱ्यांवर रोष आहे. कृषी  अधिकारी थ्रीप्सवर संशोधन झालेले नाहीअसे सांगतात. तर आंबा बागायतदारांना महागडी फवारणी औषधे देऊन फसवण्याचे काम केले न जात आहे. यात आंबा बागायतदारांचे ना आर्थिक नुकसान होत आहे. तर कृषी  अधिकारी कंपन्यांवर कारवाईही करत नाहीत, याबाबत विचार विनिमय करण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. देवगड खरेदी-विक्री संघ कार्यालयात संबंधित कंपन्या, डिलर  व बागायतदारांची संयुक्त बैठक घेणार असल्याची माहिती आ. नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देवगड तालुका आंबा बागायतदारांची बैठक आ. नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी देवगड खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आ. राणे बोलत होते. शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास रुमडे, सिंधुदुर्ग बँकेचे संचालक अॅड. प्रकाश बोडस, संकेत लब्दे आदी उपस्थित होते. थ्रीप्स नियंत्रणासाठी महागडी औषधे वापरूनही प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी त्रस्त असून त्यांनी औषधांचे पैसे न भरण्याची भूमिका घेणार आहे. यामुळे औषध कंपन्या रिकव्हरीसाठी शेतकऱ्यांवर केसेस टाकतील. त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न आ. राणे यांनी केला. शासन म्हणून आपली जबाबदारी असून शेतकऱ्यांना यातून कायमस्वरूपी बाहेर काढायचे आहे. द्राक्षाचे औषध आंब्यांसाठी वापरले तर त्याचा इफेक्ट आणि फायदा होणार नाही. ही शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक आहे. शेतकऱ्यांचा फायदा करण्याऐवजी शेतकऱ्यांची फसवणूक कंपनी करत आहे. त्यामुळे आपली तालुक्यातील डीलरना विनंती आहे. आपणही आमचे शेतकरी बांधव आहात. कंपन्या येथील आंबा बागायतदारांची फसवणूक करत असतील, तर हे थांबवले पाहिजे. याची तुम्ही दक्षता घ्या. योग्य औषध मार्केटमध्ये संशोधन करून येत नाही, तोवर गप्प बसणार नाही. औषध कंपन्यांचे डीलर हे डीलर कंपन्यांशी करार असल्यामुळे ते आपले काम करत आहेत. आज ज्या कंपन्या औषध विकत आहेत त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर त्या कंपन्यांवर फौजदारी दाखल करणार तसेच थ्रीप्ससाठीच नव्हे तर भविष्यातही शेतकरी आंबा बागायत यांना फसविण्याची हिंमत कोण करेल तर गप्प बसणार नाही.

चुकीची पद्धत असेल तर ती मोडून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. यासंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री यांची भेट घेणार असून, आंबा बागायतदारांची चूक नसून त्यांची फसवणूक झाली आहे हे त्यांना पटवून देणार आहे. आमचे सरकार सर्व आंबा बागायतदार यांच्यासोबत संकट काळात उभे राहिलं आहे, असेही आ. राणे यांनी यावेळी सांगितले.