माडखोलातील बामणादेवीवाडीच्या नळपाणी योजनेविरोधात ग्रामस्थांचं उपोषण

Edited by: विनायक गावस
Published on: November 16, 2023 19:31 PM
views 92  views

सावंतवाडी : माडखोल गावातील बामणादेवीवाडीसाठीच्या नळपाणी योजनेचे काम प्रगतीपथावर असताना गावातील जलजीवन मिशन अंतर्गत मुख्य नळपाणी योजनेच्या नुतनीकरण लाभार्थी प्रस्ताव यादीमध्ये लावलेली या वाडीतील ग्रामस्थांची नावे कमी करण्यासाठी गुरुवारपासुन या वाडीतील ग्रामस्थ माडखोल ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले.

बामणादेवीवाडीसाठी नळपाणी योजना मंजूर असून या योजनेचे कामही प्रगतीपथावर आहे. त्यात गावातील मुख्य नळपाणी योजनेच्या नूतनीकरण प्रस्तावामध्ये बामणादेवीवाडीचा समावेश नसताना प्रस्तावाच्या लाभार्थी यादीमध्ये मात्र या वाडीतील ग्रामस्थांची नावे देण्यात आलेली आहे. याला या वाडीतील ग्रामस्थांचा विरोध असून ही नावे कमी करण्यासाठी या ग्रामस्थांनी उपोषण छेडले आहे.

  या उपोषणात आत्माराम लातये, पांडुरंग सावंत, रमेश राऊळ, वासुदेव होडावडेकर, पांडुरंग राऊळ, गुंडू राऊळ आनंद राऊळ, अनिल राऊळ, राजकुमार राऊळ आदी माडखोल ग्रामस्थांचा सहभाग आहे.