
दोडामार्ग : कुडासे भोमवाडी येथील ज्ञानदेव शंकर धुरी यांच्या राहत्या घरात सोमवारी छत्तीसगड येथील प्रमोद कुमार अकबरकुमार (23) या चोरट्याने घराचे कुलूप तोडून 27 हजार पाचशे रुपयाची रोख रक्कम लंपास करत पलायन केले. मात्र, दोडामार्ग पोलिसांनी त्याला गोवा येथून ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.
याबाबत अधिक माहिती आशिकी कुडासे भोमवाडी येथे छत्तीसगड येथील काही कामगार कामा निमित्त राहत होते. सोमवारी श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त ज्ञानदेव धुरी हे आपल्या मुळ घरी उत्सवासाठी गेले होते. त्याचा फायदा घेत त्या छत्तीसगड येथील एका कामगाराने घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत घराचे कुलूप तोडले व घरात प्रवेश केला. व खोलीतील पत्र्याचे कपाट उघडून कपाटातील 27 हजार 500 रुपयाची रोख रक्कम घेऊन पलायन केले.
सदर चोर गोवा राज्यात असल्याचे खबऱ्याकडून माहिती मिळाली. या चोरी बाबत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी त्या चोराचा शोध घेण्यासाठी तात्काळ आपले पोलीस विठोबा सावंत व विजय जाधव यांचे पथक गोवा येथे पाठवले त्यावेळी त्यांना गोवा वास्को यथे सदर आरोपी आढळून आला त्याला तेथून ताब्यात दोडामार्ग पोलीस ठाण्यात आणला व त्याच्यावर 305 a, 331(3) कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीला आज दोडामार्ग न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कस्टडी देण्यात आल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.