कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर विद्युत भारीत लाईन पडली

महिलेचा जागीच मृत्यू | ग्रामस्थ आक्रमक
Edited by:
Published on: May 26, 2024 06:11 AM
views 337  views

बांदा : बांदा शहरात गडगेवाडी येथील कुंभारदेवणे ओहळात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर विद्युत भारीत लाईन तुटून पडल्याने महिलेचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. विद्या वामन बिले (वय ६०) असे त्या महिलेचे नाव आहे.

या घटनेला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप करत बांदा ग्रामस्थ आक्रमक झालेत. यावेळी मयताच्या वारसाना रोख दहा लाख रुपये भरपाई द्या अशी मागणी करण्यात आली. रोख भरपाई न दिल्यास मृतदेह सावंतवाडी वीज वितरणच्या कार्यालयात नेणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला. वीज वितरणचे तालुका अभियंता ईथे येईपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही असा सज्जड दम बांदा सहाय्यक अभियंता एस आर कोहळे याना दिला. घटनास्थळी बांदा पोलीस दाखल झाले आहेत.