
मालवण : समाजासाठी काहीतरी करायचं आहे ह्या निस्वार्थी आणि उदात्त हेतूने होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी "कमी तेथे आंम्ही" वायरी या ग्रुपच्यावतीने वायरी बांध वायरी भूतनाथ, तारकर्ली, देवबाग, देवली या गावात एकूण तब्बल बारा शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून दिले. त्यांच्या या 'एक हात आपुलकीचा' या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
"कमी तेथे आंम्ही ग्रुप" ग्रुपच्या वतीने दरवर्षी शाळकरी मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य दिले जाते. यावर्षी वायरी टिकम शाळा, वायरी भूतनाथ, अंबाजी विद्यालय वायरी, वायरी बांध, तारकर्ली मत्सशाळा, देवबाग नंबर 1, देवबाग नंबर 2, देवबाग नंबर 3, सेंटपिटर देवबाग, देवली काळेथर, देवली नंबर1, देवली नंबर 2 अशा एकुण 265 मुलांना दप्तर, वह्या, कंपास पेटि, पेन्सिल, रबर, असे शिक्षणासाठी आवश्यक असणारे साहित्य वाटप करण्यात आलं. सलग तिसऱ्यावर्षी ह्या संस्थे मार्फत हे आयोजन करण्यात आले आणि ह्या पुढे सुध्दा अशीच सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय कामे ह्या ग्रुप मार्फत होत राहतील ह्या साठी आम्ही सर्व कटिबद्ध असू. शिवाय या ग्रुपमध्ये कोणालाही सहभागी व्हायचं असेल तर ग्रुपच्या सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.