आचीर्णे ग्रामस्थांचा गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या

...तोपर्यंत माघार नाही ; शाळेच्या नादुरुस्त इमारतीचा मुद्दा
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 14, 2025 11:38 AM
views 328  views

वैभववाडी : आचिर्णे कडूवाडी येथील प्राथमिक शाळेच्या नादुरुस्त इमारती संदर्भात आज ग्रामस्थ गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनासाठी पोहचले आहेत. ठोस निर्णयाशिवाय माघार घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. लेखी आश्वासननाशिवाय माघार नसल्याची ग्रामस्थांची भूमिका आहे.