उद्योजक सुनील नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

भुईबावडा येथे तीन दिवस रंगणार विविध कार्यक्रम
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 29, 2023 09:31 AM
views 397  views

वैभववाडी : वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र तथा मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक सुनील नारकर यांचा वाढदिवसानिमित्त स्पर्शिका बिल्डर ॲण्ड डेव्हलपर्स यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्तान. क्रिकेट स्पर्धा, कबड्डी स्पर्धा तसेच महिलांकरिता खेळ पैठणीचा कार्यक्रम भुईबावडा नारकर वाडी येथे होणार आहे. या वाढदिवसानिमित्त तीन दिवस कार्यक्रम असणार आहेत.

    उद्योजक श्री नारकर यांचा ९ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि .९ एप्रिल रोजी महीलांकरिता खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये विजेत्या महीलेला एक पैठणी,एक सोन्याचा हार, एक नथ व रोख रक्कम ११ हजार रुपये तर उपविजेत्यास पैठणी, सोन्याची नथ व रोख रक्कम ५ हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे.

तसेच महीलांकरिता लकी ड्रॉ असणार आहे. यामध्ये विजेत्याला रोख रक्कम ५ हजार, मानाची पैठणी व सोन्याची नथ हे बक्षीस असणार आहे. तसेच दि १० व ११ एप्रिल रोजी पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेच प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये व चषक, द्वितीय ३१ हजार, तृतीय २१हजार , उत्कृष्ट चढाई १ हजार ५००, उत्कृष्ट पकड १हजार ५००, सर्वोत्कृष्ट खेळाडू ५हजार एक,सर्वोत्कृष्ट संघ ५ हजार एक व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेकरिता दोन हजार रुपये प्रवेश फी आहे. त्याचबरोबर दि.९, १० व ११ रोजी अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक ५१ हजार, द्वितीय ३१ हजार, तृतीय २१ हजार , शिस्तबद्ध संघ ५हजार एक, उत्कृष्ट फलंदाज १५००, उत्कृष्ट गोलंदाज १५००,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक १५००, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ५००१ व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेकरिता प्रवेश फी अडीच हजार रुपये आहे.दोन्ही स्पर्धेकरिता प्रत्येक संघातील ९ खेळाडूंना टि शर्ट वाटप करण्यात येणार आहे.या स्पर्धेकरिता ५एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करायची आहे.सर्व स्पर्धेकरिता स्पर्धकांनी ६ वा स्पर्धा स्थळी उपस्थित राहावे.सर्व खेळाडू व सर्व रसिकांची जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. तिन्ही स्पर्धेचे बक्षीस वितरण ११ एप्रिल रोजी रात्री ८ वा होणार आहेत. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी इंद्रजित समई ९३७३७८९७७०,सुरज मोरे ७४९८८४०१५४ या नंबरवर संपर्क साधला.