सिंधुदुर्गवासियांना 'जाणता राजा' महानाट्य मोफत पाहण्याची सुवर्णसंधी

नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 18, 2024 06:22 AM
views 554  views

वैभववाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई  व जिल्हा प्रशासन आणि आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

18 ते 20 मार्च या कालावधीत नाधवडे महादेव मंदिर , वैभववाडी येथे सायंकाळी 6.30 ते 10.00 या वेळेत होणार आहे. हे महानाट्य सर्व नागरिकांसाठी मोफत पाहता येणार आहे