बाजारात सहज न मिळणाऱ्या वस्तूंचे दालन वेंगुर्ल्यात

आकार आयोजित आपली मुंबई ग्राहक पेठ घेऊन आलेत मकर संक्रांती स्पेशल..!
Edited by:
Published on: January 06, 2025 17:48 PM
views 592  views

बाजारात सहज न मिळणाऱ्या विविध वस्तूंचे दालन आकार आयोजित आपली मुंबई ग्राहक पेठ वेंगुर्ले शहरात घेऊन आले आहेत. नववर्ष आणि मकर संक्रातीच्या निमित्ताने महिला व लघु उद्योजकांच्या उत्पादित गृहोपयोगी व गृह सजावटीच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री येथील साई मंगल कार्यालय येथे १ जानेवारी २०२५ पासून सुरू आहे. 

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर दि. १ जानेवारी २०२५ पासून सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत ही ग्राहक पेठ वेंगुर्ला साई मंगल कार्यालय येथे सुरू करण्यात आली आहे.  बाजारात सहज न मिळणाऱ्या नेहमी घरगुती वापरात येणाऱ्या विविध वस्तु या ग्राहक पेठेत उपलब्ध आहेत. यात खास आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य स्टडी टेबल, विविध पद्धतीची फोल्डिंग डायनींग टेबल्स, कमी जागेत ऍडजस्ट होणारी लाकडी डायनींग टेबल्स, विविध पद्धतीची कपाटे, सागवानी व एम एस/ एस एस फर्निचर, आकर्षक साड्या, ड्रेस मटेरियल, खादी शर्टस याचबरोबर फॅन्सी ज्वेलरी कंझ्युमर दालन, दर्जेदार फूड प्रॉडक्ट, अॅक्युप्रेशर मटेरियल, मुखशुध्दी मुखवास, कॉस्मेटिक, पापड, गव्हाची बिस्कीट, इलेक्ट्रीक धूपदाणी, किचन वेअर, सुवासिक अगरबत्ती, धुपस्टिक, गॅसची बचत करणारी तंदूर जाळी, तसेच ४ साईज मध्ये उपलब्ध असलेली चटई कम गादी गवताच्या काड्या, फोम व बेडशीट या पासून बनविलेली गादी चटई, लहानांपासून थोरांपर्यंत सहजपणे फोल्ड करता येणारी प्रवासात, पिकनीक, हॉटेल, हॉस्टेल, गृहप्रवेश, वाढदिवस या सारख्या सणा समारंभासाठी भेट देण्यासाठी उपयुक्त अशा अनेक व्हरायटीज या एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

तर आजच भेट द्या आकार आयोजित आपली ग्राहक पेठला .. साई मंगल कार्यालय, एसटी स्टँड जवळ वेंगुर्ला वेळ सकाळी १० ते रात्रौ ९ वाजेपर्यंत...