पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा स्नेहमेळावा संपन्न

कार्यरत व निवृत्त सहाय्यक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांची उपस्थिती
Edited by: विनायक गांवस
Published on: April 08, 2023 19:01 PM
views 191  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा स्नेहमेळावा कोंकण हेरिटेज रिसॉर्ट, तुळसुली, ता. कुडाळ येथे संपन्न झाला. यावेळी विभागातील कार्यरत व निवृत्त सहाय्यक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीला सर्वांचे स्वागत झाल्यानंतर मेळाव्यास उपस्थित राहू न शकलेले सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिकारी डॉ. मधुकर घारपुरे व डॉ. वा. ल. तेली यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर श्री व सौ दीपक माईणकर यांनी स्वागत गीत म्हटले. श्री माईणकर सवादे, तांबे, वराडकर, श्री. मेतर सौ पांगरडकर इ कर्मचाऱ्यांनी काही गाणी सादर केली. संगीत साथ सौ माईणकर यांनी केली. सौ परब,पांगरडकर,झेमणे, जोगळे इ महिला कर्मचाऱ्यांनी स्वागत गीत सादर केले.

दुपारच्या भोजनानंतर विभागाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी डॉ पावसकर, डॉ खानोलकर, श्री शिरसाट, श्री देसाई, श्री साळगावकर, श्री साळगावकर, श्री कुंकवळेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. 

डॉ.  ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले. असा स्नेहमेळावा दरवर्षी घेण्याचे ठरले. मेळाव्याच्या आयोजनासाठी डॉ ठाकूर, डॉ. गवस व श्री बांबर्डेकर यांनी परिश्रम घेतले.