मालवाहू टेम्पोची उभ्या 5 दुचाकींना ठोकर

पोलीस उशिरा आल्याने वाद चिघळला
Edited by: विनायक गांवस
Published on: September 09, 2025 21:27 PM
views 110  views

सावंतवाडी : शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल शेजारील जिम समोर उभ्या केलेल्या पाच दुचाकींना मालवाहू टेम्पोन ठोकर दिली. यात पाचही दुचाकींच नुकसान झालं. बराच वेळ होऊन देखील पोलिस घटनास्थळी दाखल नव्हते त्यामुळे वातावरण तंग झाले होते. 

मच्छि मार्केट रोड येथे ही घटना घडली. यात एका मालवाहू टेम्पोने पाच दुचाकींना ठोकर दिली. यात त्या गाड्यांच मोठं नुकसान झालं.‌ टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप नुकसानग्रस्त दुचाकी मालकांनी केला आहे. यामुळे वातावरण देखील तंग झाले होते. बराचवेळ पोलीस दाखल न झाल्यानं वादही चिघळला होता. अखेर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी हा वाद शांत करत पुढील सोपस्कार पार पाडले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक सरदार पाटील, पोलिस हवालदार मंगेश शिंगाडे, संभाजी पाटील, मयूर निरवडेकर आदी पोलिस घटनास्थळी उपस्थित होते.