हायवेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

सुदैवाने जीवितहानी नाही गाड्यांचे नुकसान
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 02, 2022 12:48 PM
views 1295  views

कणकवली : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूचं आहे. त्यात आता खारेपाटण येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचं नुकसान झालंय.


तीन गाड्यांचा विचित्र अपघात 

आज सकाळी १०:३० वाजता नडगिवे येथील एका हॉटेल समोर  खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका आणि अवजड वाहन कंटेनर तसेच आयशर टेम्पो या तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन या अपघातामध्ये खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे नुकसान झाले आहे. मात्र या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कसा झाला अपघात ?

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार  मुंबई - गोवा महामार्गावर खारेपाटण नडगिवे येथे खारेपाटण प्रा. आ. केंद्राची रुग्णवाहिका वाहन क्र. MH07 AJ2339 ही गाडी चालक  येथील  सर्विसिंग सेंटर वर गाडी सर्विसिंग करण्यासाठी घेऊन आले होते. याच दरम्यान गोवा वरून आलेला व मुंबईच्या दिशेने जाणारा अवजड कंटेनर वाहन क्र. GT15YY9604 चालक पिंटोसिंग यादव वय - ३३ राहणार -  बिहार हा भरधाव वेगात घेऊन येत असताना समोर उभा असलेला आयशर टेम्पो वाहन क्र. MH04JK4324 याला घासत सर्विसिंग सेंटर मध्ये आत प्रवेश करणाऱ्या खारेपाटण प्रा आ केंद्राच्या रुग्णवाहिकेला सुद्धा जोरदार धडक दिल्यामुळे या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात खारेपाटण प्रा आ केंद्राच्या रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे.