
सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका माजी नगरसेवकाला सिंधुदुर्ग पोलिसांनी तीन जिल्ह्यांतून हद्दपार केले आहे. उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (अ) (ब) अन्वये हा आदेश जारी केला आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
ते म्हणाले, पदावर असताना या व्यक्तीन माझ्यासह गोरगरिबांना त्रास दिला. माझा व्यवसाय उद्धवस्त केला. याच्यामुळे माझं कुटुंब माझ्यासह आठ दिवस आमरण उपोषणाला रस्त्यावर बसल होत. उपरलकर, पाटेकर देवाच्या भुमीत सत्याला न्याय मिळतो तसाच न्याय मला मिळाला आहे. संबंधित माजी नगरसेवकावर आज हद्दपारीची कारवाई झाली आहे. आम्ही सामाजिक कार्यकर्ते असून दुश्मनाच्या मदतीला धावून जातो. मात्र, अशा काही वाईट प्रवृत्तींना शासन होणं तेवढच आवश्यक होतं. आज ते झालं, यासाठी पोलिसांसह प्रशासनाला धन्यवाद देतो. त्या माजी नगरसेवकान या शिक्षेतून बोध घेऊन वर्षभरात स्वतःमध्ये सुधारणा करावी. यापुढे गोरगरिबांना त्रास देणं, धमकावण बंद करावं अस मत सामाजिक कार्यकर्ते श्री. जाधव यांना व्यक्त केले.