
कुडाळ : कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी साजरा होत आहे. या सुवर्णमयी सोहळ्याचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, कुडाळच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी, ९ एप्रिल रोजी हळदीचे नेरूर येथील श्री देव जटाशंकर मंदिर येथे लघुरुद्र व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १० एप्रिल रोजी नेरूर येथील श्री कलेश्वर मंदिर येथे अभिषेक करून वाढदिवसाच्या मुख्य कार्यक्रमांचा शुभारंभ होईल.
आंतरराज्य बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा
पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाप्रेमींसाठी दोन मोठ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत:
राज्यस्तरीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा: सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत ३०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. यामध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबईसह बेळगाव आणि गोवा येथील आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंचा सहभाग असेल.
जिल्हास्तरीय सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा: सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने होणारी ही स्पर्धा १०० हून अधिक खेळाडूंच्या सहभागाने रंगणार आहे.
बक्षिसांचा वर्षाव
बुद्धिबळ: प्रथम ५ विजेत्यांना रोख रक्कम व चषक, तर पहिल्या ३० स्पर्धकांना रोख बक्षिसे व मेडल दिले जातील. सर्व खेळाडूंना टी-शर्ट व प्रमाणपत्र दिले जाईल. ८ ते १७ वयोगटातील मुले-मुलींसाठी विशेष उत्तेजनार्थ बक्षिसे असतील.
कॅरम: पहिल्या ४ क्रमांकांसाठी आकर्षक रोख रक्कम आणि चषक देण्यात येणार आहेत.
वेळ आणि स्थळ:
या दोन्ही स्पर्धा शुक्रवार, १० एप्रिल रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत श्री महालक्ष्मी हॉल, कुडाळ (हॉल नं. १ व २) येथे पार पडतील.
नोंदणीसाठी संपर्क
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
बुद्धिबळ स्पर्धा: श्रीकृष्ण आडेलकर (९४२२३८१९४९)
कॅरम स्पर्धा: योगेश फणसळकर (७६२०७५५७६६)
खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत. १० एप्रिल रोजी होणाऱ्या या क्रीडा महोत्सवात क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे










