रस्त्यालगत आढळलं मृत बिबट्याचे पिल्लू !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 16, 2024 06:18 AM
views 640  views

राजापूर  : तालुक्यातील जानशी रस्ता येथील कातळसडा या ठिकाणी महेश पटवर्धन यांच्या मालकीच्या बंदीस्त चिरा कंपाऊंडच्या बाजूला रस्त्यालगत बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले आहे. वनविभागाकडून या मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जानशी रस्ता येथील कातळसडा या ठिकाणी रस्त्यालगत बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिस पाटील राजेंद्र कृष्णा तांबे यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनी वरून दिली. त्यांनंतर वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी येऊन पाहणी केली, असता सदरचा बिबट्या बछडा हा रस्त्याच्याकडेला मृत आवस्थेत पडला होता. हा मृत बिबट्या बछडा हा मादी असून त्याचे वय साधारण तीन महिने असल्याचे वनविभागाने सांगितले.  

बिबट्याची शिकार किंवा विषबाधा झाली आहे काय याची खात्री पशुवैद्यकीय  अधिकारी व वन अधिकारी यांनी केली. पशुवैद्यकीय राजापूर यांच्यामार्पत  बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी सदरचा बिबट्या बछडा हा उपासमारीमुळे मृत झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी राजापूर यांनी सांगितले. त्यानंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे ,वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या बछड्यास लाकडाची चिता रचून त्याला जाळून नष्ट करण्यात आले.  

यावेळी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक राजापूर विक्रम पुंभार व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, गणेश गुरव, निलेश म्हादये उपस्थित होते. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फी क्रमांक 1926  किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्प साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केली आहे.