भुईबावडा घाटात दरड कोसळली | वाहतूक ठप्प

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 27, 2023 17:43 PM
views 239  views

वैभववाडी : भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून २किमी अंतरावर दरड कोसळली.सायंकाळी ४च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे या घाटातील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे.दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी दरड हटविण्याचे काम करत आहेत.