सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा उत्साहात

Edited by: विनायक गांवस
Published on: January 04, 2025 12:37 PM
views 187  views

सावंतवाडी : सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्था संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये  शुक्रवार ३ जानेवारी २०२५ रोजी  केजी विभाग व इ. १ ली ते ४ थी वर्गाची वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

       

यावर्षीची वेशभूषा  स्पर्धेमध्ये केजी विभागमधील नर्सरी वर्गातील खेळणी, ज्यूनियर केजी  हेल्दी व जंकफूड, सीनियर केजी  जीवनावश्यक वस्तू  तसेच इ . १ ली भारत देशातील विविध राज्यनिहाय पारंपरिक वेषभूषा इ २  री आकाश गंगा, इ . ३  री भारतीय वैद्यानिक व इ . ४ थी  भारतीय ऑलिम्पिक विजेते या विषयावर आधारीत घेण्यात आली होती. अशा वेगवेगळ्या अनोख्या वेशभूषांच्या आधारे तसेच शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.वेशभूषा स्पर्धेचे परिक्षक म्हणून पंचम  खेमराज महाविद्यालयाच्या प्राध्यापिका पुनम नाईक आणि हर्षदा परब यांनी काम पाहिले. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली. या कार्यक्रमाला सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी ,पालक - शिक्षक संघ कार्यकारणी समितीचे सर्व पदाधिकारी ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला 

हेशागोळ ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .