आंबोली घाटात गाडी अडवून डॉक्टरास मारहाण प्रकरण ; आरोपींची जामिनावर मुक्तता

Edited by: विनायक गावस
Published on: July 07, 2023 14:56 PM
views 255  views

सावंतवाडी : आंबोली घाटामध्ये गाडीला साईड न दिल्याच्या रागातून निपाणी येथील डॉक्टर धीरज पोळ यांना १.अल्ताफ सिकंदर सामनेवाले रा.बुधगाव,सांगली २.सिध्दांत मनोज च्व्हारीया रा. आकुर्डी, पुणे ३.चेतनसिंह मोहनसिंह मेहता रा. आकुर्डी, पुणे ४.सर्फराज अस्लम सामनेवाले रा.चिंचवड,पुणे यांनी त्यांची गाडी अडवून मारझोड केल्याचा प्रकार दि.१४/०५/२०२३ रोजी घडला होता. त्याकामी पोळ यांनी दिलेल्या तक्रारी वरून संबंधीत आरोपी यांच्या विरुद्ध सावंतवाडी पोलिस ठाण्यात भा. द. सं. कलम ३२३,३४१,३५१,४२७,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

या प्रकरणी संबंधित आरोपी न्यायालयासमोर हजर झाले असता सावंतवाडी येथील मे.न्यायालयाने ॲड. निरवडेकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी यांची रक्कम रु.१५,०००/- च्या जामिनावर मोकळीक केलेली आहे.याप्रकरणी ॲड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.