
सिंधुदुर्गनगरी : सरंबळ-सिमीदेवी बस स्टॉप जवळ आज सकाळी झालेल्या दुचाकी आणि एसटी बस अपघात प्रकरणी बस चालक विजय नारायण म्हाडगूत (वय ३७, रा. आंबेरी, ता. कुडाळ) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात शुभम विठ्ठल परब (वय २६,रा. सरंबळ देऊलवाडी) याचा मृत्यू झाला होता तर रमेश शंकर दांडकर हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी सरंबळ येथील जयसिंग कृष्णा कदम यांनी कुडाळ पोलिसात फिर्याद दिली. एसटी बस चालक विजय नारायण म्हाडगुत याच्यावर बीएनएस १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), मो.अधि.क.१८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय म्हाडगूत यांनी आपल्या ताब्यातील एस.टी.बस (क्र.MH14/ BT/1703) ही पाऊस चालु असतानाही निष्काळजीपणे चालवुन समोरुन येणारे ज्युपिटर स्कुटरला (MH 07 AN 2959) जोरदार ठोकररुन अपघात केला.
सदर अपघातात स्कुटर चालक शुभम विठ्ठल परब (वय २६ वर्षे) याच्या मृत्यूस तसेच रमेश शंकर दांडकर (वय ५५ वर्षे) यांचे गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला म्हणुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप.नि. कऱ्हाडकर अधिक तपास करत आहेत.