
सावंतवाडी : स्वतःसह चार वर्षांच्या मुलगा आणि इतर दोन मुलांवर पेट्रोल ओतून जीवे मारण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला होता. याप्रकरणी संबंधितावर पत्नीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
स्वतःसह मुलाच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हुसेन गडीयाली याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. पती- पत्नीच्या वादातन हा प्रकार घडला. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पती हुसेन गडीयाली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली अशी माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.