'त्या' महीलेविरोधात गुन्हा दाखल

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 07, 2024 06:47 AM
views 525  views

वैभववाडी : स्टॉल हटविण्यास विरोध करून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिला स्टॉलधारक अंजली शिवगण हिच्या विरोधात पोलीसांनी सरकारी कामात अटकाव केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात काल (ता.५)रात्री उशिरा नगरपंचायतीने पोलीसांत तक्रार दिली होती.त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहरात नगरपंचायत कार्यालयासमोर  नगरपंचायतीने फुटपाथ व आधार भिंतीचे सुशोभिकरण केले आहे. या फुटपाथवर शिवगण यांनी स्टॉल बसविला होता. तो स्टॉल हटविण्यासाठी काल नगरपंचायतीचे कर्मचारी गेले असता आहे. त्यांनी त्यांची शिलाई मशीन उचलुन नगरपंचायतीत नेली. त्यानंतर शिवगण या आक्रमक झाल्या. माझी शिलाई मशीन स्टॉलमध्ये आणुन ठेवा असा आग्रह त्यांनी धरला परंतु नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडुन प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी स्टॉलमध्ये असलेली डिझेलची बाटली बाहेर काढली. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यासमोर त्यांनी डिझेल अंगावर ओतली. त्यानंतर माचीस घेवुन त्या स्वताला पेटवुन घेणार एवढ्यात जवळ असलेले काही ग्रामस्थ आणि नगरंपचायतीचे कर्मचारी यांनी माचीस काढुन घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकारानतंर त्या महिलेची प्रकृती खालावली होती.तिला येथील ग्रामीण रूग्यालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, नगरपंचायतीचे कर्मचाऱ्याने शिवगण यांच्या विरोधात स्टॉल हटविण्यास विरोध केल्याची. फिर्याद पोलीसांत दिली. त्यानुसार पोलीसांनी त्या महिलेविरोधात सरकारी कामात अटकाव करण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल करीत आहेत.