विना परवाना दारु बाळगल्याप्रकरणी भुईबावडा रिंगेवाडीतील तरुणावर गुन्हा दाखल | १६ हजार २०० रुपयांचा माल जप्त

Edited by:
Published on: July 28, 2023 18:44 PM
views 142  views

वैभववाडी : विनापरवाना दारू विक्री करणा-या भुईबावडा रिंगेवाडी येथील जितेंद्र जयसिंग चव्हाण (वय ३५)याला रंगेहाथ पकडले.आज ता.२८ रोजी दुपारी वैभववाडी पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग यांच्यावतीने होळीचा मांड येथे ही कारवाई करण्यात आली.यामध्ये १६हजार २००रुपयाचा माल पोलीसांनी जप्त केला आहे.

भुईबावडा परिसरात विना परवाना दारु विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलीसांनी आज सापळा रचला.दुपारी १२च्या दरम्यान संशयित आरोपी हा भुईबावडा येथील होळीचा मांड येथे पिशवी घेऊन आला.दरम्यान त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत हनी ब्लेंड नावाचा लेबल असलेल्या १६,हजार २०० रुपये किंमतीच्या १८०मिलीच्या ८१ बाॅटल सापडून आल्या.ही सर्व दारू पोलीसांनी जप्त केले.संशयित आरोपीला टेबल जामीन देऊन सोडण्यात आले.