कोकणच्या मातीतला ब्रॅण्ड | 'एक्सोबाईट'चा शुभारंभ !

Edited by: विनायक गांवस
Published on: April 14, 2024 08:10 AM
views 237  views

सावंतवाडी : मनोज पराडकर आणि माझी पन्नास वर्षांची मैत्री आहे. गाव सोडून लोक शहरात जात असताना ते शहर सोडून, नोकरी सोडून गावात आले हे कौतुकास्पद आहे. पराडकर फार्ममुळे गुगल मॅपवर माडखोल धरणासह 'पराडकर फार्म' ही दिसणार आहे. पराडकर यांनी शहरातून गावात येत कृषी क्रांतीसाठी पाऊल टाकलं आहे. नेहमीच संघर्ष आणि मेहनतीतून ते पुढे आलेत. त्यामुळे त्यांचा हा प्रोजेक्ट देखील निश्चित यशस्वी होईल असा विश्वास अभिनेते राजेंद्र शिसतकर यांनी व्यक्त केला. माडखोल येथील एक्सोबाईट' ब्रॅण्डच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते.  

माडखोल येथील पराडकर फार्मच्या माध्यमातून देशी-विदेशी ताज्या आणि पौष्टिक भाजांच उत्पादन घेतलं जातं आहे. एकाच पॉली हाऊसमध्ये सहा भाज्यांच उत्पादन घेतलं जातं असून आज रविवारी 'एक्सोबाईट' या ब्रॅण्डच अनावरण अभिनेते राजेंद्र शिसतकर यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रसाद देवधर, पराडकर फार्मचे प्रगतशील शेतकरी मनोज पराडकर, अभिश्री पराडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

माडखोल नमसवाडी येथील पराडकर फार्ममध्ये ऑयस्टर मशरूम, चेरी टोमॅटो, ब्रोकोली, झुकीनी, हॅलपीनो आदी भाज्या पिकवल्या जात आहेत.प्राधान्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात व गोवा मार्केट येथे या भाजांजा पुरवठा केला जाणार आहे. या 'एक्सोबाईट' ब्रॅण्डच अनावरण रविवारी अभिनेते राजेंद्र शिसतकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी गावातील विद्यार्थांना शिष्यवृत्ती, माडखोल गावातील प्रयोगशील जिल्हा परिषद शाळा नंबर एक व नंबर दोनला मदत व शेतीसाठी योगदान देणाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. यामध्ये स्वप्नील लातये, सविता लातये, सुनिता रणसिंग, प्रमोद सावंत, ओंकार कोठावळे, प्रथमेश परब, छाया कोठावळे, चंद्रकांत राऊळ, चंद्रकला राऊळ, सुधाकर रणसिंग, सत्यवान राऊळ, निलेश लातये, मिथून रेडीज, साक्षी रामदुरकर, यश कुलकर्णी, अरविंद सरनोबत, समृद्धी परब, दुर्वा राऊळ, यशवंत म्हालटकर, आत्माराम राऊळ आदींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

याप्रसंगी उपस्थित मान्यवर सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रसाद देवधर, रूपेश देसाई, माडखोल उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ, माजी सरपंच सुर्यकांत राऊळ, डॉ. लक्ष्मीप्रसाद मगदूम यांनी मनोगत व्यक्त करत पराडकर यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या उपक्रमाच्या माध्यमातून किमान ३०० जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार देण्याचा मानस प्रगतशील शेतकरी मनोज पराडकर यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी अभिनेते राजेंद्र शिसतकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रसाद देवधर, पराडकर फार्म चे सर्वेसर्वा मनोज पराडकर, रूपेश देसाई, माडखोल उपसरपंच जीजी राऊळ, माजी सरपंच सुर्यकांत राऊळ, संजय राऊळ, अभिश्री पराडकर, डॉ. लक्ष्मीप्रसाद मगदूम, प्रभाकर देसाई, दत्ताराम राऊळ आदींसह पराडकर फार्मचे कर्मचारी, माडखोल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.