जिमखाना मैदानाच्या बाजूच्या झाडाची फांदी ठरतेय धोकादायक

सामाजिक बांधिलकीने वेधलं 'बांधकाम'चं लक्ष
Edited by: विनायक गावस
Published on: June 27, 2023 10:12 AM
views 152  views

सावंतवाडी : जिमखाना मैदान येथील कार पार्किंग च्या ठिकाणी बेळगाव (आंबोली) हायवेच्या बाजूला असलेल्या मोठ्या झाडाची फांदी पूर्णपणे सुकलेली असून वादळी पावसामध्ये तुटून कधीही  हायवे वर पडून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या अगोदरही सदर झाडाच्या सुकलेल्या फांद्या हायवेच्या मधोमध पडत असतात या सर्व परिस्थितीची पाहणी करून याची बांधकाम विभागाने दखल घ्यावी. योग्य ती कार्यवाही करून या झाडाची सुकलेली फांदी तात्काळ तोडण्यात यावी. पुढे होणारा अनर्थ टाळावा  अशी सामाजिक बांधिलच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे.