
देवगड : विजयदुर्ग गिर्ये समुद्रमाध्ये 17 वाव जलधी क्षेत्रामध्ये कर्नाटक येथील मलपी हायस्पीड नौकेला विना परवाना मासेमारी केल्या प्रकरणी मत्स्य् व्यवसाय विभागाच्या गस्तीपथकाने गस्तीनौकेच्या सहाय्याने नौकेला ताब्यात घेवून दंडात्मक कारवाई केली आहे.
मलपी उडपी येथील हायस्पीड ट्रॉलर मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने शितल गस्ती नौकेच्या सहाय्याने 17 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. दरम्यान विजयदुर्ग गिर्ये समुद्रात 17 वाव दरम्यान पकडला आहे. सदर मलपी ट्रॉलर्सचे नाव विठठल रखुमाई असे असून सदर ट्रॉलरवरती तांडेल सहीत सात खलाशी आहेत. महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रामध्ये विना परवाना मासेकारी केल्याने सदर नौका जप्त करण्यात येवून देवग्ड बंदरात ठेवण्यात आली आहे. सदर नौकेवरील मासळीचा लिलाव करुन सदर नौकेवर दंडात्मक कारवाईसाठी सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय मालवण,सिंधुदूर्ग यांचेकडे प्रतिवेदन दाखल करण्यात येणार आहे.
नौका पकडण्याच्या कामी देवगड परवाना अधिकारी रविंद्र मालवणकर, सागरी सुरक्षा रक्षक संतोष ठुकरुल,धाकोजी खवळे,अमित बांदकर, हरेश्वर खवळे तसेच गस्तीनौका कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.