रस्त्यावर पडलं भलं मोठं झाड ; सामाजिक बांधिलकी धावली मदतीला

Edited by: विनायक गावस
Published on: July 26, 2023 11:55 AM
views 213  views

सावंतवाडी : निरुखेवाडी येथे सकाळी सात वाजता रस्त्यावर झाड पडल्याची कल्पना सामाजिक बांधिलकीला नगर परिषदेची कर्मचारी परवीन शेख यांनी दिली. यावेळी सामाजिक बांधिलकीची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सांगेलकर हे त्या ठिकाणी युद्ध पातळीवर काम करत होते.

 त्यांच्यासोबतच सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, श्याम हळदणकर व सुजय सावंत यांनी झाड तोडून हटवण्यास मदत केली. परंतु, झाड खूप मोठे असल्याकारणाने महेंद्र सांगेलकर यांनी संकेत मुंडये यांच्या मालकीचा जेसीबी मागून हे मोठे झाड रस्त्यावरून हटवण्याचे विनामूल्य मोठे कार्य केले. त्याप्रसंगी पोलीस कर्मचारी महेश अरवारी, जगदीश दूधवाडकर यांनी रस्त्यावरील ट्राफिक सुरळीत केली.  तसेच ग्रामस्थ बाबा शिंदे ,मोहन ठाकूर व विजय बहादूर हे रस्त्यावरील झाड हटवण्याच्या कामी कार्यरत होते.  याच मार्गाने आज सकाळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा ताफा जाणार होता त्यामुळे हे काम युद्ध पातळीवर करण्यात आले.