
सावंतावडी : सध्या सुरु असलेल्या वादळीवारे आणि मुसळधार पावसामुळे नेमळे पाटकरवाडी येथील मुख्य रस्त्यावर मध्यरात्री जांभळीचे भले मोठे झाड मोडून पडल्या मुळे विद्दूयत पोल मोडून तारा तुटून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. गेले चार पाच दिवस चतुर्थी सणातही ठिकठिकाणी वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्याने चार पाच दिवस नेमळे गाव अंधार मय होता.
त्यात हे मध्यरात्री जांभळीचे झाड तुटून पडल्यामुळे तीन पोल मोडून पडले आहेत. मात्र, यामुळे कुठच्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. विद्युत वाहिनीवर पडलेले झाड बाजूला करून तुटलेले विद्युत पोल उभारून लवकरात लवकर लाईट पूर्ववत करावी अशी मागणी तेथील ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे.