
दोडामार्ग : स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाले आणि प्रत्येक राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली. अस असताना दोडामार्ग मधील एका राजकीय पक्षाचा बडा नेता निवडणुकीच्या तोंडावर धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. दोडामार्ग मधील सर्व पक्षांनी प्रत्येक मरदारसंघा साठी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. जि. प व पंचायत समितीवर आपलाच झेंडा फडकणार असल्याचा दावा ही करण्यात येत आहे. त्यातच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर एका पक्षातील बडा नेता शिंदे शेनेत प्रवेश करणार आहे. अशी माहिती दोडामार्गच्या राजकीय सूत्रांकडून मिळाली आहे.