अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी कोल्हापूरातील १९ वर्षीय युवकाला पॉस्को अंतर्गत अटक

Edited by: दिपेश परब
Published on: July 04, 2023 19:50 PM
views 237  views

वेंगुर्ला : कोल्हापूर राधानगरी येथील आरोपी पंकज गौतम निकम (वय १९) याने वेंगुर्ला येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी पंकज निकम याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला  कुडाळ तेंडोली येथून ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्याला आज विशेष न्यायालय सिंधुदुर्ग येथे हजर केले असता. न्यायालयाने त्याला दिनांक ६ जुलै रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत वेंगुर्ला कॅम्प येथील नितीन अर्जुन पवार यांनी वेंगुर्ले पोलिसात २५ जून २०२३ रोजी फिर्याद दिली होती. यानुसार कोल्हापूर राधानगरी येथील आरोपी पंकज गौतम निकम याने अल्पवयीन मुलीला पळवून नेलेले होते. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी हा अल्पवयीन मुली सोबत कुडाळ- तेंडोली येथील बागेत असल्याची माहिती वेंगुर्ले पोलिसांना मिळाल्याने त्या अल्पवयीन मुलीस ३ जुलै २०२३ रोजी वेंगुर्ला पोलिसानी ताब्यात घेतले. पीडित मुलीकडे चौकशी करता तपासात आरोपीत याने तिच्याशी शरीर संबंध ठेवल्याचे समजून आल्याने आरोपी पंकज निकम याच्यावर भा. द. वि. कलम पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

दरम्यान त्याला आज विशेष न्यायालय सिंधुदुर्ग येथे हजर केले असता न्यायालयाने दिनांक ६ जुलै २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश पाटील, महिला पोलीस हवालकदार रंजिता चौहान, महिला पोलीस कॉन्स्टेबल भाटे व धुरी हे करीत आहेत.