
दोडामार्ग : भोमवाडी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर चा आठवा वर्धापन दिन आज गुरुवार दि. 08 मे रोजी संपन्न होणार आहे.
यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद - महाप्रसाद, स्थानिक ग्रामस्थांचे भजन व रात्री 9.30 वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण वेंगुर्ला यांचा कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी हा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन भोमवाडी ग्रामस्थांनी केले आहे.