शहरातील ८० टक्के मत राणेंना देणार : संजू परब

Edited by: विनायक गांवस
Published on: May 04, 2024 10:08 AM
views 144  views

सावंतवाडी : नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत मैदानात उतरले आहोत. त्यामुळे शहरातील ८० टक्के मत आम्हाला मिळतील. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा किमान अडीच लाखांनी विजय होईल असा विश्वास माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला. 

ते म्हणाले,  नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मैदानात उतरलो आहोत. व्यापारी वर्गाच्या भेटीगाठी आम्ही घेत आहोत. स्वतः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आमच्यासोबत प्रचारात असल्यानं वेगळं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवसांपूर्वी भव्य प्रचार रॅली आम्ही शहरात काढली. ८० टक्के मत आम्हाला मत मिळतील अडीच लाखांनी नारायण राणे निवडून येतील. आम्ही केलेल्या विकासाच्या जोरावर आम्ही निवडून येऊ. विनायक राऊत यांना विकासाच्या मुद्द्यावर इथली जनता आपला फैसला दाखवून देईल अस मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित, परिक्षित मांजरेकर, सत्यवान बांदेकर, कुणाल शृंगारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.