वेंगुर्ला : तालुक्यातील पालकरवाडी ग्रामपंचायतच्या वतीने २१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कॉम्प्युटर द्वारे मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ७५ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराचे उदघाटन ग्रामपंचायत पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ग्रा प सदस्य सुभद्रा गोसावी, यशवंत कापडी, रमिता गावडे, विकास अणसुरकर आदी उपस्थित होते. डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयाच्या उदय दाभोलकर यांनी या शिबिरात रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.
तसेच या शिबिरात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नेत्रपटल शस्त्रक्रिया (डोळ्याचा मागचा पडदा) व इंजेक्शन, तिरळेपणावरची व अश्रू पिशवीची शस्त्रक्रिया डॉ. गद्रे रुग्णालय वेंगुर्ला येथे मोफत केले जातील अशी माहिती दिली.