सिंधुदुर्गात 74.25 टक्के मतदान

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 02, 2025 19:18 PM
views 65  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असून या मतदान प्रक्रियेला मतदार राजाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील या चारही ठिकाणी म्हणून सुमारे 74.25 टक्के एवढे मतदान झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमा नुसार उद्या म्हणजेच बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी या नगरपरिषदांचे निकाल जाहीर होणार होते मात्र हे निकाल आता 21 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीला सामोरे गेलेल्या उमेदवारांसह सर्वच पक्षांना 21 डिसेंबर पर्यंत ची वाट पहावी लागणार आहे.

जिल्ह्यातील तीनही नगरपरिषद आणि एक नगरपंचायत यांसाठी आज मतदान झाले असून त्या चार ठिकाणी मिळून सुमारे 74.25 % एवढे मतदान झाले आहे. यात कणकवली नगरपंचायतीसाठी विक्रमी असे 79 .71% एवढे मतदान झाले आहे तर सावंतवाडी नगर परिषदेसाठी 69 वेंगुर्ले नगर परिषदेसाठी 74.28% मालवण नगर परिषदेसाठी 74.4% एवढे मतदान झाले आहे.