वायरी वराडकरवाडीत छाप्यात गोवा बनावटीची ७ हजारांची दारू जप्त | महिलेविरोधात गुन्हा दाखल

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 03, 2023 10:57 AM
views 737  views

मालवण : शहरातील वायरी वराडकरवाडी येथे पोलिसांनी आज सायंकाळी टाकलेल्या छाप्यात गोवा बनावटीची सुमारे ७ हजार १०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. 

वायरी परिसरात सायंकाळी पोलीस गस्त घालत असता वराडकरवाडी येथे एक महिला दारू विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती बंगडे, पोलीस उपनिरीक्षक शिवराम झांजुर्णें यांनी अचानक छापा मारला. यात हर्षदा खुरंदळे या महिलेकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या ८८ बाटल्या सापडून आल्या. या सर्व बाटल्या जप्त करत श्रीमती खुरंदळे हिच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.