
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेमार्फत गावागावांत असलेल्या दिव्यांग बांधवांची माहिती संकलित करण्यासाठी अभियान राबविण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यात 7 हजार 826 दिव्यांग बांधव असून यामध्ये अंध-863, कर्णबधिर- 393,मुकबधीर-482, अस्थिव्यंग-3 हजार 699, मतिमंद- 2 हजार 7, व इतर 382 असे दिव्यांग बांधव आढळून आले, असल्याची माहिती जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी बाळकृष्ण परब यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावरील उपकर निधीमधून विविध योजनांमधून स्वयंरोजगारासाठी किंवा इतर कारणांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. अशाप्रकारे सहाय्य करताना जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती स्तरावर दिव्यांग बांधवांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नव्हती. अलीकडेच जिल्हा परिषदेमार्फत गावागावांत असलेल्या दिव्यांग बांधवांची माहिती संकलित करण्याबाबत अभियान राबविले गेले. आता ही माहिती उपलब्ध झाली असून, जिल्ह्यात आठ तालुक्यात मिळून एकूण 7,826 दिव्यांग बांधव असून यामध्ये 863 अंध, 393 कर्णबधिर, 482 मुकबधीर, 3,699 अस्थिव्यंग, 2,007 मतिमंद व 382, इतर असे आढळून आले आहेत.
दिव्यांग बांधवांची माहिती संकलित करताना त्यांनी आतापर्यंत घेतलेला शासकीय योजनांचा लाभ, त्यांना असलेल्या अत्यावश्यक गरजा याबाबतची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना कोणत्या योजनांची प्राधान्याने गरज आहे हे सुद्धा निश्चित करणे सुलभ होणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळकृष्ण परब, यांनी दिली आहे.