सावंतवाडीच्या संजय गांधी अनुदान योजनेच्या सभेत 65 प्रकरणे मंजूर

Edited by: विनायक गावस
Published on: May 29, 2023 18:56 PM
views 145  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका संजय गांधी अनुदान योजना समितीची सभा गुरुवारी तहसिलदार सावंतवाडी अरुण उंडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला वासुदेव नाईक, गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी, सागर साळुंखे, मुख्याधिकारी, नगरपरिषद सावंतवाडी, मनोज मुसळे, नायब तहसिलदार डी. व्ही. मेस्त्री, अव्वल कारकून आदि उपस्थित होते.

या सभेत संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी विधवा नि. वे. योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचा 68 प्रकरणांपैकी 65 प्रकरणे मंजूर व 03 प्रकरणे नामंजूर करण्यात आली.