मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय बजेटमधून सावंतवाडीसाठी 51 कोटी 60 लक्ष निधी

शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची माहिती
Edited by: विनायक गांवस
Published on: March 15, 2023 16:59 PM
views 311  views

सावंतवाडी : नुकत्याच झालेल्या युती शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेटमधून दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातून ग्रामीण मार्ग मजबुतीकरणासाठी रुपये १२ कोटी, राज्यमार्ग, इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग मजबुतीकरणासाठी रुपये २९ कोटी ६० लक्ष. तसेच प्रादेशिक पर्यटनासाठी रुपये १ कोटी निधी उपलब्ध करुन मंजूरी दिली आहे.

खाडीलगत धुपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी बांदा-शेर्ले खाडीलगत बंधारा बांधणे रुपये २ कोटी, शेर्ले खाडीलगत धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे रुपये १ कोटी ३२ लक्ष, आरोंदा खारभूमी क्र. २ (थोरले खाजण) येथे धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे रुपये २ कोटी, सातार्डा खाडीकिनारी जेटी बांधणे रुपये १ कोटी ५० लक्ष, आरोंदा खाडीकिनारी जेटी बांधणे रुपये १ कोटी, शेर्ले येथे संरक्षण भिंत बांधणे रुपये १ कोटी, अशी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहीती मंत्री केसरकर यांच्या संपर्क कार्यालयातून शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी दिली. भरीव निधी उपलब्ध झाल्याने दीपक केसरकर यांचे जनतेने आभार व्यक्त केले आहेत.