प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये 50 टक्के आरक्षण मराठी माणसांसाठी देण्याची बंधन घालावीत

बबन साळगावकर यांची मागणी
Edited by: विनायक गावस
Published on: October 01, 2023 16:43 PM
views 110  views

सावंतवाडी : मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथील कमर्शियल कॉम्प्लेक्स टॉवर रेसिडेन्सी टॉवर्स मध्ये 50 टक्के आरक्षण मराठी माणसांसाठी ठेवण्याचा कायदा महाराष्ट्र विधिमंडळामध्ये सर्व आमदारांनी एकत्र येऊन करावा आशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. दरम्यान गेले अनेक वर्ष मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम संत गतीने सुरू आहे. त्यातीलच एक सुप्त गतीने टॉवर्समध्ये मराठी माणसाला सदनिका, शॉपिंग गाळे नाकारून परप्रांतीय बिल्डर लोकांचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप देखील साळगावकर यांनी यावेळी केला आहे.

प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये 50 टक्के आरक्षण मराठी माणसांसाठी देण्याची बंधन घालावे. आज मुंबईमध्ये मराठी मनुष्य उपनगरामध्ये दिसत आहे‌‌. काही दिवसानंतर मुंबईत मराठी मनुष्य शोधावे लागतील. मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेत्यांनी मराठी माणसांसाठी सक्षम कायदा तयार करून महाराष्ट्रातील मराठी माणसांना दिलासा द्यावा आशी मागणी देखील बबन साळगावकर यांनी यावेळी केली आहे.