कोचरा निवती खाडीत वॉटर स्पोर्ट्ससाठी दिपक केसरकर यांच्या माध्यमातून ५० लाखांचा निधी

Edited by: दिपेश परब
Published on: March 16, 2024 07:23 AM
views 299  views

वेंगुर्ले : महाराष्ट्र शासनाच्या कोकण ग्रामीण पर्यटन योजने अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारशीने कोचरा व निवती गावातील खाडीमध्ये जलक्रीडा (वॉटर स्पोर्ट्स) साठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती कोचरा सरपंच योगेश तेली यांनी दिली आहे.