खा. विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून २५ कि.मी.चे 5 रस्ते मंजूर : रूपेश राऊळ

इन्सुली गावात महत्त्वाचे दोन रस्ते मंजूर
Edited by: विनायक गांवस
Published on: December 29, 2022 16:49 PM
views 256  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात प्रधानमंत्री सडक योजनेतून खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून २५ किलोमीटरचे ५ रस्ते मंजूर झाले आहेत.प्रामुख्याने इन्सुली गावात महत्त्वाचे दोन रस्ते मंजूर झाले आहेत, अशी माहिती ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली.

खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते पंतप्रधान सडक योजनेतून शिफारस केली होती त्यात सावंतवाडी तालुक्यातील पाच कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे तालुक्यातील २५ किलोमीटर रस्त्याची कामे होतील असा विश्वास रूपेश राऊळ यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, इन्सुली गावातील दोन महत्त्वाच्या रस्त्यांना यामध्ये मंजूरी मिळाली आहे. त्यात इन्सुली क्षेत्रफळ वेत्ये सोनुर्ली रस्ता ३.१६५ किमी,निगुडे पिटीलवाडी सावंतटेंब कोंडवाडा एक्साईज दलीतवाडी रस्ता ५.१०५ किमी , याशिवाय पारपोली देवसू ओवळीये कलबिंस्त ५.१ किमी,तिरोडा सदानंद मठ गुळदूवे ५.४५ किमी, बांदा बांदेश्वर मंदिर सटमट डिगंणे रस्ता ५.१०५ किमी, आदी कामे पंतप्रधान सडक योजनेतून खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीनुसार मंजूर झाली आहेत असे राऊळ यांनी सांगितले.