प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवलं ; रेडीतल्या तरुणाला 5 लाखाला गंडवलं

Edited by: दिपेश परब
Published on: January 02, 2024 18:12 PM
views 3401  views

वेंगुर्ला : तालुक्यातील रेडी बोंबडोजीचीवाडी येथे राहणाऱ्या व बीइ इलेक्ट्रिकल शिक्षण होउन कोकण रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलट या पदावर असलेल्या एका तरुणाची मूळ गुजरात येथे राहणाऱ्या व सध्या इंग्लंड येथे वास्तव्यास असलेल्या ड्रीटी आकाश नामक महिलेने मराठी मॅट्रिमोनि डॉट कॉम या साईट वरून ओळख करून व लग्नाचे आमिष दाखवून ५ लाख ४० हजार २२३ रुपये रकमेची फसवणूक केली आहे. 

   याबाबत अधिक माहिती अशी की, मूळ गुजरात येथे राहणाऱ्या व सध्या आपण इंग्लंड येथे वास्तव्यास असल्याचे सांगून  ड्रीटी आकाश नामक महिलेची रेडी बोंबडोजीची वाडी येथील एका तरुणाशी ओळख झाली. त्या दोघांच्यात ऑनलाइन संभाषण होऊन मैत्री झाली व त्यांचे प्रेम जुळले. यानंतर आपल्याला लग्न करायचे असे सांगून ती महिला आपण दिल्ली विमानतळावर आले असल्याचे व वेगवेगळी कारणे सांगत दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ ते ८ डिसेंबर २०२३ या कालावधीत त्या तरुणाकडून सुमारे ५ लाख रुपये उखळले. याबाबत त्या तरुणाने आज २ डिसेंबर रोजी वेंगुर्ला पोलिसात आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. यानुसार त्या महिलेवर गुन्हा दाखल केला असून वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव याचा अधिक तपास करत आहेत.